Sunday, December 28, 2008

निरोप

सखे माझे मन दाटून आले
तुला निरोप देताना
तुझ्या माझ्या त्या गोड आठवणी जपतना
तुझा तो गोड अन लजरा चेहरा आठवताना
मन माझं वेडे झाले
तुझ्या आठवणिं मध्ये जगताना
तुझ्या वेड्या भवनान्मध्ये रमताणा
भाव प्रेमाचा अखंड चेहर्याहुनी तुझ्या
ओसंडून वाहत होता
अश्रूंच्या गारटेत मला तो लोटत होता
पण.....
सखे हे अश्रू दुखाचे नाही
यात आहे तुझ्या भवितव्याचे सुख
तरीही एक वेडी आशा आहे
तुझ्या परत येण्याची...
सांग ना सखे अजुन किती दिवस
मी तुझी वाट पाहायची...

<शब्द-सखा>

Thursday, December 25, 2008

तू...

शब्द माझे शब्द तुझे
माझ्या शब्दाहुनी सखे गोड तू...
प्रीत माझी प्रीत तुझी...
माझ्या प्रीतिहुनी सखे जवळ तू...

हास्य माझे हास्य तुझे
हास्याहुनी सखे निखळ तू...
करतेस सखे तू शृंगार किती??
त्याहूनी सखे उजळ तू....


सूर तुझा ताल माझा
त्याहूनी सखे मधुर तू..
ओठ तुझे गुलाबकळी..
त्याहूनी सखे नितळ तू...

रात्र माझी दिवस तुझा
त्याहूनी सखे प्रखर तू..
चित्र तुझे हृदया मध्ये
त्याहूनी सखे सजीव तू

का उभी सखे अशी अबोल पने
शब्दाना वाट दे तू,,
जीव मला होईन ग जड..
लाजू नको सखे घोर तू...

तूच माझी मीच तुझा
हे वचन मला देशील का तू..??
या जुलमी जगाशी लढेल मी
सखे साथ मला देशील का तू??

<शब्द-सखा>