Friday, July 25, 2008

शब्द-सखा च्या सखीने माझ्या वर केलेली ही कविता...

नमस्कार मित्रहोआज पर्यंत तुम्ही मी कोणावर तरी लिहिलेल्या कविता वाचल्या...
पण ह कविता या शब्द-सखा च्या सखीने त्याच्या वर केलेली ही कविता...
जी मुलगी कविते ला बोअर म्हणायची ती
जेव्हा प्रेमात पडली तेव्हा तिने ही कविता केली..

प्रेम हे नक्की काय असतं???
प्रेम हे नक्की काय असतं???
कोणी घेतलेली काळजी असतं ??
की कोणी निरागस पने
व्यक्त केलेली भावना असतं
आज तुझ्यावर खर्या अर्थाने
कविता करावीशी वाटते
प्रेम करावेसे वाटते....
पानझडी च्या ऋतुत सुद्धा
माझ्या मनाला कोंब फुटतात
आज अंगाला झोंबणारा गार वारा
सुद्धा तुझ्या कुशीत गरम भासतो
माझ्या साठी असलेल्या भावना
जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसतात
तेव्हा त्या बर्‍याच काही सांगून जातात
तुझा अल्लद पणा मनाला स्पर्श देतो...
जसे मी सुंदर नसताना
देखील सुंदरतेचा आभास देतो......

Thursday, July 24, 2008

Kahi Charolya

सुचले काही शब्द
काही कल्पनात विरले..
भावलेल्या क्षणांना
मी कवितेत रचले

Wednesday, July 16, 2008

निघुन गेलेली तु..

आता फक्त निघुन गेलेली तु..
आणि वळणावर, भिजत राहिलेल्या वाटा अश्रुंनी..
अश्रु देखील सरत आलेले..
विरत जाणाऱ्या इंद्रधनुसारखे..
तरी आतुन एक खोल बोभाटा,
कुणास ठाउक किती काळ
किंचाळत राहील अजुन..
सगळ जुन जुन झालेलं
आकाशपण दुर उठणारा
धुळीचा लोट मात्र अगदी ताजा,
नवीन तु तर कधीच पोहोचलीस
दुर पलीकडच्या देशात.
.मी मात्र अजुन तळमळतोय,धावतोय..
तुझ्या सावलीच्या मॄगजळामागे.
आता फुटेलच छाती,
आणि कदाचीत पुढच्या
क्षणाला प्राणांचा बांध..
आणि वाहुन जाईल पुला खालुन
खळाळणारं प्रेम मनाच्या आतलं..
आता तुझी खुण म्हणुन
राहिलेलं काहीच नाही
आलेल्या वादळाने
सारं सारं पुसुन नेलं
मागे राहिले फक्त
डोळ्यात खुपणारे मातीचे कण..
त्यातुन वाहणारी वेदना,
आणि,थोडीशी कविता..
बाकी भिजलेली वाटही सुकेल आता..
प्राणांच्या चिखलासारखी..
मागे उरेल ती
फक्त निघुन गेलेली तु ..

Tuesday, July 8, 2008

सखे तू सोबत असताना..

सखे तू सोबत असताना..
माझी प्रत्येक सकाळ ही आनदाणे खुलायाची
सोनेरी पावलांनी जणू अप्सराच पृथ्वीवर यायची...

सखे तू सोबत असताना..
तो वारा ही शांत वाहायचा
जणू तो ही तुझ्या गोड बोलन्याने
मंत्रमुग्धा व्हायचा ...

सखे तू सोबत असताना..
प्रत्येक फूल ही हसताना दिसायचे
जणू तेही उमळण्यासाठी
तुझ्या येण्याची वाट पाहायचे

सखे तू सोबत असताना..
त्या झरा च्या पाण्यात ही संगीत असायचे
जणू ते ही आपल्या प्रेमाचे
बेधुन्द गीत गायचे

सखे तू सोबत असताना..
प्रत्येक सायंकालही मोहक व्हायची
जणू तिलाही तुझ्या
गुलाबीओठांची च रंगात यायची

सखे तू सोबत असताना..
ती रात्रहि लवकर सारायची
जणू ती ही कोणाला तरी
भेटण्यासाठी आतुर व्हायची

सखे तू सोबत असताना..
काही काळ मन ही विसावायचे
पुढच्या भेटीसाठी पुन्हा
तुझीआतुरतेने वाट पाहायचे...

तू ....

तू श्वासातही गंध वासातही
तूच तू भवती हर्ष मासाताही
तूच तू हृदया मध्ये खोल झन्कारते
हाय गाता तू गीत प्रकाशाचे..
तूच तू ओठांतुनी गर्द घाटातुनी
अंतरीच्या गुलाबी सैर लाटातुनी
तूच तू मनाच्या मनी लहर ही श्रावणी
साठता तू हळूच मीटते माझी पापणी

सॉफ्टवेर गारवा :

काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
काम जरा जास्त आहे, दर रिलीज़ ला वाटत ...
भर दुपारी रिवीव् (review) होउन "डिजाईन " मनात साठत... !
तरी बोटे चालत रहातात . डोके मात्र चालत नाही ...
बग ट्रैक मधे मेजोर Defects शिवाय काहीच दिसत नाही ..!!
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
तितक्यात कुठून एक मेल Inbox मधे येतो ...
रिलीज़ डेट दोन दिवसांनी Postpone करून जातो .. !!!
माउस उनाड मुला सारखा सैरावैरा पळत राहतो ...
CC, Forwards, Songs आणि Winamp मधे जाऊ पाहतो ..!!!!
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
कोडिंग संपून टेस्टिंग चा सुरु होतो पुन्हा खेल …
डॉक्युमेंटेशन संपता संपता येउन ठेपते रिलीज़ ची वेळ .. !!!!
चक्क डोळ्यांसमोर सगला कोड अचानक चालू लागतो .... ……………..
UAT मधे तरीही कुठून Defect येतो .. ????? ...

Monday, July 7, 2008

कुठतरी मन वाकड चालत होतं...

मेघ आले गडगडाट झाला
पावसान साररान हिरव केल होतं
तरीही मी निस्तब्ध तसाच
कुठतरी मन वाकड चालत होतं
पावसाळा गेला होता आन् हिवाळा येत होता
थंडिनं आंग गार केले होतं
तरीही मी अस्वस्थ तसाच
कुठतरी मन वाकड चालत होतं

हिवाळा जात होता उन्ह जरा जाणवत होतं
वार्‍या न एखादं पान हलत होतं
तरीही मी अनांतात हरवत होतो
कुठतरी मन वाकडं चालत होतं

ऋतू येत होते ऋतू जात होते
ऋतू प्रमाणे आग ही बदलत चाललं होतं
तरीही माझे विचार हे कोलमडले
कुठतरी मन वाकड चालत होतं

एक नजर

सखे सागराची खोलीतुझी एक नजर
प्रेमाची बरसात
तुझी एक नजर
आनंदाची सुरेल लहर
तुझी एक नजर
प्रेमाची मधुर वाणी
तुझी एक नजर
नशेने भरलेला मदिरेचा एक प्याला
तुझी एक नजर
माझे मन मोहित करणारी
तुझी एक नजर
माझ्यासाठी आशेचा एक किरण
तुझी एक नजर
सुनी मैफिल सुरेल बनविनारी
तुझी एक नजर
माझी प्रेरणा अन शक्ति
सखे तुझी एक नजर
सखे तुझी एक नजर

कधीतरी तू माझी होशील काय??

सखे प्रातः समयी माझ्या डोळ्यांसमोर तुझाच चेहरा उभा असतो...
अशीच गत तुझी होत असेल काय???
सखे कधीतरी तू माझी होशील काय???

ऐन दुपारच्यावेळी उन्हात फिरत असतो..
सूर्याचा एक एक किरण मेंदू मध्ये शिरत असतो...
या आठवणींचे चटके कोण शमवेल काय??
सखे कधीतरी तू माझी होशील काय???

सखे सायंकालच्या कातरवेळी सूर्य मंद होत असतो..
जगाच्या कानाकोपर्‍यात अंधाराचसावत येतो..
त्या अंधराला प्रकाशाचा तांग पत्ता कोण विचारेल काय??
सखे कधीतरी तू माझी होशील काय???

सखे गुलाबी थंडीच्या पहाटेरस्त्यावर धुक्याच साम्राज्य असते..
अशा रस्त्यामध्ये मला तुझे घर सापडेल काय??
सखे कधीतरी तू माझी होशील काय??

धुक निघून गेल्यावर..
गवतावर दवाचे थेंब जमतात...
त्या दवान्चे आयुष्या कोण सांगेल काय??
सखे कधीतरी तू माझी होशील काय??

पाऊस पडून गेल्यावरवस्त्या सगळ्या वाहून जातात..
अशा पावसात माझ्या प्रेमाचा संसार उभा राहील काय??
सखे कधीतरी तू माझी होशील काय??

आयुष्याचा प्रवास संपताना
सखे मला तुझ्याच प्रेमाचा ग आधार...
कधी झालीच तू माझी तर...
सखे तुझ्या कुशीत माझे प्राण जातील काय??
सखे कधीतरी तू माझी होशील काय??