Monday, July 7, 2008

एक नजर

सखे सागराची खोलीतुझी एक नजर
प्रेमाची बरसात
तुझी एक नजर
आनंदाची सुरेल लहर
तुझी एक नजर
प्रेमाची मधुर वाणी
तुझी एक नजर
नशेने भरलेला मदिरेचा एक प्याला
तुझी एक नजर
माझे मन मोहित करणारी
तुझी एक नजर
माझ्यासाठी आशेचा एक किरण
तुझी एक नजर
सुनी मैफिल सुरेल बनविनारी
तुझी एक नजर
माझी प्रेरणा अन शक्ति
सखे तुझी एक नजर
सखे तुझी एक नजर

1 comment:

Megha Bargaje said...

poem s good. but one suggeston never mae a person ur nspraton. f nspraton hurts u . then u ll be a dead person.