Wednesday, July 16, 2008

निघुन गेलेली तु..

आता फक्त निघुन गेलेली तु..
आणि वळणावर, भिजत राहिलेल्या वाटा अश्रुंनी..
अश्रु देखील सरत आलेले..
विरत जाणाऱ्या इंद्रधनुसारखे..
तरी आतुन एक खोल बोभाटा,
कुणास ठाउक किती काळ
किंचाळत राहील अजुन..
सगळ जुन जुन झालेलं
आकाशपण दुर उठणारा
धुळीचा लोट मात्र अगदी ताजा,
नवीन तु तर कधीच पोहोचलीस
दुर पलीकडच्या देशात.
.मी मात्र अजुन तळमळतोय,धावतोय..
तुझ्या सावलीच्या मॄगजळामागे.
आता फुटेलच छाती,
आणि कदाचीत पुढच्या
क्षणाला प्राणांचा बांध..
आणि वाहुन जाईल पुला खालुन
खळाळणारं प्रेम मनाच्या आतलं..
आता तुझी खुण म्हणुन
राहिलेलं काहीच नाही
आलेल्या वादळाने
सारं सारं पुसुन नेलं
मागे राहिले फक्त
डोळ्यात खुपणारे मातीचे कण..
त्यातुन वाहणारी वेदना,
आणि,थोडीशी कविता..
बाकी भिजलेली वाटही सुकेल आता..
प्राणांच्या चिखलासारखी..
मागे उरेल ती
फक्त निघुन गेलेली तु ..

1 comment:

Unknown said...

kay mast lihili ahes yaar wah khup chan...................