नमस्कार मित्रहोआज पर्यंत तुम्ही मी कोणावर तरी लिहिलेल्या कविता वाचल्या...
पण ह कविता या शब्द-सखा च्या सखीने त्याच्या वर केलेली ही कविता...
जी मुलगी कविते ला बोअर म्हणायची ती
जेव्हा प्रेमात पडली तेव्हा तिने ही कविता केली..
प्रेम हे नक्की काय असतं???
प्रेम हे नक्की काय असतं???
कोणी घेतलेली काळजी असतं ??
की कोणी निरागस पने
व्यक्त केलेली भावना असतं
आज तुझ्यावर खर्या अर्थाने
कविता करावीशी वाटते
प्रेम करावेसे वाटते....
पानझडी च्या ऋतुत सुद्धा
माझ्या मनाला कोंब फुटतात
आज अंगाला झोंबणारा गार वारा
सुद्धा तुझ्या कुशीत गरम भासतो
माझ्या साठी असलेल्या भावना
जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसतात
तेव्हा त्या बर्याच काही सांगून जातात
तुझा अल्लद पणा मनाला स्पर्श देतो...
जसे मी सुंदर नसताना
देखील सुंदरतेचा आभास देतो......
Friday, July 25, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment