Tuesday, July 8, 2008

सखे तू सोबत असताना..

सखे तू सोबत असताना..
माझी प्रत्येक सकाळ ही आनदाणे खुलायाची
सोनेरी पावलांनी जणू अप्सराच पृथ्वीवर यायची...

सखे तू सोबत असताना..
तो वारा ही शांत वाहायचा
जणू तो ही तुझ्या गोड बोलन्याने
मंत्रमुग्धा व्हायचा ...

सखे तू सोबत असताना..
प्रत्येक फूल ही हसताना दिसायचे
जणू तेही उमळण्यासाठी
तुझ्या येण्याची वाट पाहायचे

सखे तू सोबत असताना..
त्या झरा च्या पाण्यात ही संगीत असायचे
जणू ते ही आपल्या प्रेमाचे
बेधुन्द गीत गायचे

सखे तू सोबत असताना..
प्रत्येक सायंकालही मोहक व्हायची
जणू तिलाही तुझ्या
गुलाबीओठांची च रंगात यायची

सखे तू सोबत असताना..
ती रात्रहि लवकर सारायची
जणू ती ही कोणाला तरी
भेटण्यासाठी आतुर व्हायची

सखे तू सोबत असताना..
काही काळ मन ही विसावायचे
पुढच्या भेटीसाठी पुन्हा
तुझीआतुरतेने वाट पाहायचे...

No comments: