मेघ आले गडगडाट झाला
पावसान साररान हिरव केल होतं
तरीही मी निस्तब्ध तसाच
कुठतरी मन वाकड चालत होतं
पावसाळा गेला होता आन् हिवाळा येत होता
थंडिनं आंग गार केले होतं
तरीही मी अस्वस्थ तसाच
कुठतरी मन वाकड चालत होतं
हिवाळा जात होता उन्ह जरा जाणवत होतं
वार्या न एखादं पान हलत होतं
तरीही मी अनांतात हरवत होतो
कुठतरी मन वाकडं चालत होतं
ऋतू येत होते ऋतू जात होते
ऋतू प्रमाणे आग ही बदलत चाललं होतं
तरीही माझे विचार हे कोलमडले
कुठतरी मन वाकड चालत होतं
Monday, July 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
i man wakade chlale aahe..
mast re..
Post a Comment