मला वाटतं ...
मला वाटतं ...अंधारलेल्या वाटेवरून
चालताना ..
दीवा होउन ..
तू यावं...
गुदामरालेल्या जीवाला
जगावताना
श्वास होउन तू यावं ..
ध्येय नसलेलं
आयुष्य जगताना
आशा होउन
तू यावं
भरकटलेलं मन
सावरताना
दिशा होउन
तू यावं
तुझ्या विना
जगताना सखे
मरण होउन
तू यावं
नसता तू जवळ
अश्रू बनून याव
विरहातल्या मला
चिंब भिजवाव
होऊन झुळुक वार्याची
स्पर्शून मला जाव
मंद तुझा सुगंध
श्वासात मिसळाव
उशाशी होऊन निशा
मला हलकेच निजवाव
येऊन स्वप्नात माझ्या
मला घट्ट जवळ घ्याव
स्नेहा ( देवराई )
जेव्हा होईल
सकाळ,
किरण होऊन
तू यावं
जेव्हा होईल
रात्र ,
चांदणे होऊन
तू यावं ,
रुसलो
कधी मी
तर हसू होऊन
तू यावं
उदास मी
असताना
नवीन बहर होऊन
तू यावं,
वाट जरी असली
या जीवनाची खडतर
रस्ता बनून
तू यावं ,
माझ्या या दुखी
जीवनात
सुख बनून
तू यावं......
ჱܓ शब्द सखा ●๋•

1 comment:
माझ्या या दुखी
जीवनात
सुख बनून
तू यावं.....agdi sukhad aahe kavita..khup surekh....!!
Post a Comment