Tuesday, February 10, 2009

शोध

चारोळ्या लिहीत असताना
यमक मी शोधत होतो
कवितेच्या वाटेवरती
सखे मी मलाच शोधत होतो

आयुष्याच्या रस्त्यावरून जाताना
स्वप्नाच्या पाउल वाटा शोधत होतो
मृगजलाच्या स्वप्नांमध्ये
मी मलाच शोधत होतो

जगाच्या या पसार्या मध्ये
अस्तित्वाचा ठाव घेत होतो
कृष्ण-धवल मतांच्या लोकांमध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

खूप लांबवर पळत असताना
क्षितीजाला मी शोधत होतो
क्षितीजा पलीकडच्या जागा मध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

आपल्या लोकांमध्ये असताना ही
आप्त् जन मी शोधत होतो
त्यांच्या निरागस चेहर्यांमध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

चुक बरोबरच्या हिशोबात
सारखाच मी चुकत होतो
या शोधाचा अंत जाणून ही
सखे मी मलाच शोधत होतो

कधी वाटते या आयुष्या मध्ये
मी बरीच पाप केली होती
पाप-पुण्याच्या गणितात
पुण्याचा हातचा शोधत होतो
पुण्याच्या या स्नाचा मध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

<शब्द-सखा>

1 comment:

Unknown said...

आपल्या लोकांमध्ये असताना ही
आप्त् जन मी शोधत होतो
त्यांच्या निरागस चेहर्यांमध्ये
सखे मी मलाच शोधत होतो.....
far surekh....!!