Monday, April 13, 2009

पहावे एकदा प्रेम करून...

पहावे एकदा प्रेम करून
कुणासाठी तरी वेडे होवून
मग त्या ढगात चेहरा तिचा दिसतो
आपण पक्षी होवून उडतच राहतो

पहावे एकदा प्रेम करून
जाव कोणाच्या तरी आठवनित व्याकुळ होवून
अन घालावा बांध नयनातल्या अश्रुंना
फ़क्त तिच्या खांद्यावर डोके ठेवून

पहावे एकदा प्रेम करून
आपले ह्रदय टाकावे देवून
करताना प्रेम समोरच्यावर
आपणच जावे त्याच्या रंगात रंगून

पहावे एकदा प्रेम करून
टाकावा दुसरयावर जिव ओवाळून
स्वतासाठी जगण्या ऐवजी
तिच्यासाठी तिचे जीवन होवून......

शब्द - सखा ( राकेश )

2 comments:

devrai said...

khupach sundar...............

Unknown said...

पहावे एकदा प्रेम करून
टाकावा दुसरयावर जिव ओवाळून
स्वतासाठी जगण्या ऐवजी
तिच्यासाठी तिचे जीवन होवून....!!
khup chhann....!
पाहावे एकदा प्रेम करून,
त्यालाच आपले सर्वस्व मानून,
हात हाती त्याचा घेवून ,
फिरावे स्वपनांच्या गावा मन भरून ....!!