Thursday, April 16, 2009

व्याकुळ तुझ्यासाठी

वेडा मी पण आहे
कळते मला तुझे
माझ्यासाठिचे जीव तोड़ने
माझ्या भल्यासाठी तुझी तळमळने

पण काय करू कामामधे असतो मी व्यस्त
मला दुखावायाचे नसते कधीही तुला
मला रडवायचे नसते कधीही तुला
तुझा एक अश्रु करून टाकतो घायाल मला
माहीत आहे हे तुलाही
तरीही तू एक एक अश्रु का घालवते वाया ?

हे सारे मला समजते
पण काय करू
कामामधे असतो मी व्यस्त

आणि राहिला प्रश्न तुला विसरण्याचा
मी माझा श्वास घ्यायचा विसरेन
पण तुला मी कधीही विसरणार नाही
मारताना सुद्धा मी यमराजाला सांगेन
बाबा थांब मला माझ्या "सखी " ला भेटू देत

परत कधीही म्हणुन नकोस
मी तुला विसरेन
जिव्हारी लागतात तुझे ते शब्द
घ्यायाळ होतो मी तुझे अश्रु पाहून
समजुन घे मीही मला तू
मीही जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर

पण "सखे " एक सल्ला आहे
या "शब्दसख्या " कडून ..तुझ्या भल्यासाठी
बरेच जणांना वाटते तुझी निखळ मैत्री
म्हणजे प्रेम आहे
एखाद्याला जपणे म्हणजे प्रेम आहे
असाच कोणीतरी व्याकुळ होइल तुझ्यासाठी
जसा " मी " तुझ्यासाठी अन " तू " माझ्यासाठी .................

शब्द - सखा ( राकेश )

तुझे एक - एक अश्रु आहेत हीरे - मोती

नाही नाही वेडयासारख प्रेम करण
अजिबात गुन्हा नाही
तू करतेस तसाच मीही करतो
पण माझे प्रेम तू अजिबात समजुन घेत नाहीस

तुझा माझ्या सोबत नसण
कायम मला जाणवत
तुझ्या विरहात माझ मन
सतत जळत असते

समजेल तुला सुद्धा हे
नक्कीच एक दिवस
ज्याला आपण देव मानतो
तो हे नक्कीच जाणतो

तुझी किम्मत मला माझ्या
श्वासा इतकीच आहे
जगण्या पाण्याची गरज
तितकीच तू मला हवी आहेस

तुझे एक - एक अश्रु
आहेत हीरे - मोती
त्यासाठी करेन मी माझ्या
सर्वस्वाची ओंजल रीती

शब्द - सखा ( राकेश )

Monday, April 13, 2009

पहावे एकदा प्रेम करून...

पहावे एकदा प्रेम करून
कुणासाठी तरी वेडे होवून
मग त्या ढगात चेहरा तिचा दिसतो
आपण पक्षी होवून उडतच राहतो

पहावे एकदा प्रेम करून
जाव कोणाच्या तरी आठवनित व्याकुळ होवून
अन घालावा बांध नयनातल्या अश्रुंना
फ़क्त तिच्या खांद्यावर डोके ठेवून

पहावे एकदा प्रेम करून
आपले ह्रदय टाकावे देवून
करताना प्रेम समोरच्यावर
आपणच जावे त्याच्या रंगात रंगून

पहावे एकदा प्रेम करून
टाकावा दुसरयावर जिव ओवाळून
स्वतासाठी जगण्या ऐवजी
तिच्यासाठी तिचे जीवन होवून......

शब्द - सखा ( राकेश )

Tuesday, February 10, 2009

शोध

चारोळ्या लिहीत असताना
यमक मी शोधत होतो
कवितेच्या वाटेवरती
सखे मी मलाच शोधत होतो

आयुष्याच्या रस्त्यावरून जाताना
स्वप्नाच्या पाउल वाटा शोधत होतो
मृगजलाच्या स्वप्नांमध्ये
मी मलाच शोधत होतो

जगाच्या या पसार्या मध्ये
अस्तित्वाचा ठाव घेत होतो
कृष्ण-धवल मतांच्या लोकांमध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

खूप लांबवर पळत असताना
क्षितीजाला मी शोधत होतो
क्षितीजा पलीकडच्या जागा मध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

आपल्या लोकांमध्ये असताना ही
आप्त् जन मी शोधत होतो
त्यांच्या निरागस चेहर्यांमध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

चुक बरोबरच्या हिशोबात
सारखाच मी चुकत होतो
या शोधाचा अंत जाणून ही
सखे मी मलाच शोधत होतो

कधी वाटते या आयुष्या मध्ये
मी बरीच पाप केली होती
पाप-पुण्याच्या गणितात
पुण्याचा हातचा शोधत होतो
पुण्याच्या या स्नाचा मध्ये
सखे मी मलाच शोधत होतो

<शब्द-सखा>

मला वाटतं ...

मला वाटतं ...

मला वाटतं ...
अंधारलेल्या वाटेवरून
चालताना ..
दीवा होउन ..
तू यावं...
गुदामरालेल्या जीवाला
जगावताना
श्वास होउन तू यावं ..
ध्येय नसलेलं
आयुष्य जगताना
आशा होउन
तू यावं
भरकटलेलं मन
सावरताना
दिशा होउन
तू यावं
तुझ्या विना
जगताना सखे
मरण होउन
तू यावं


नसता तू जवळ
अश्रू बनून याव
विरहातल्या मला
चिंब भिजवाव

होऊन झुळुक वार्याची
स्पर्शून मला जाव
मंद तुझा सुगंध
श्वासात मिसळाव

उशाशी होऊन निशा
मला हलकेच निजवाव
येऊन स्वप्नात माझ्या
मला घट्ट जवळ घ्याव

स्नेहा ( देवराई )

जेव्हा होईल
सकाळ,
किरण होऊन
तू यावं
जेव्हा होईल
रात्र ,
चांदणे होऊन
तू यावं ,

रुसलो
कधी मी
तर हसू होऊन
तू यावं
उदास मी
असताना
नवीन बहर होऊन
तू यावं,
वाट जरी असली
या जीवनाची खडतर
रस्ता बनून
तू यावं ,
माझ्या या दुखी
जीवनात
सुख बनून
तू यावं......

ჱܓ शब्द सखा ●๋•

Sunday, December 28, 2008

निरोप

सखे माझे मन दाटून आले
तुला निरोप देताना
तुझ्या माझ्या त्या गोड आठवणी जपतना
तुझा तो गोड अन लजरा चेहरा आठवताना
मन माझं वेडे झाले
तुझ्या आठवणिं मध्ये जगताना
तुझ्या वेड्या भवनान्मध्ये रमताणा
भाव प्रेमाचा अखंड चेहर्याहुनी तुझ्या
ओसंडून वाहत होता
अश्रूंच्या गारटेत मला तो लोटत होता
पण.....
सखे हे अश्रू दुखाचे नाही
यात आहे तुझ्या भवितव्याचे सुख
तरीही एक वेडी आशा आहे
तुझ्या परत येण्याची...
सांग ना सखे अजुन किती दिवस
मी तुझी वाट पाहायची...

<शब्द-सखा>

Thursday, December 25, 2008

तू...

शब्द माझे शब्द तुझे
माझ्या शब्दाहुनी सखे गोड तू...
प्रीत माझी प्रीत तुझी...
माझ्या प्रीतिहुनी सखे जवळ तू...

हास्य माझे हास्य तुझे
हास्याहुनी सखे निखळ तू...
करतेस सखे तू शृंगार किती??
त्याहूनी सखे उजळ तू....


सूर तुझा ताल माझा
त्याहूनी सखे मधुर तू..
ओठ तुझे गुलाबकळी..
त्याहूनी सखे नितळ तू...

रात्र माझी दिवस तुझा
त्याहूनी सखे प्रखर तू..
चित्र तुझे हृदया मध्ये
त्याहूनी सखे सजीव तू

का उभी सखे अशी अबोल पने
शब्दाना वाट दे तू,,
जीव मला होईन ग जड..
लाजू नको सखे घोर तू...

तूच माझी मीच तुझा
हे वचन मला देशील का तू..??
या जुलमी जगाशी लढेल मी
सखे साथ मला देशील का तू??

<शब्द-सखा>